11th Admission 2023 : विद्यार्थी मित्रानो करावी ऑनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज सकाळी 10 वाजता जाहीर करण्यात आली आहे. तसेच या यादीत पहिल्या पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे आवश्यक आहे.
नवोदय विद्यालय विद्यालय समिती निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
कारण पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट होऊनही प्रवेश नाकारल्यास विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी दिली जाणार नसून या एका फेरीपुरते विद्यार्थ्यांना प्रवेश फेरीतून बाद केले जाणार आहे, असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
11th Admission 2023 : पहा काय सांगितले शिक्षण मंडळाने
त्यानंतर तिसऱ्या म्हणजेच शेवटच्या गुणवत्ता यादीत या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार – पहिल्या गुणवत्ता यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी 21 जून सकाळी 10 ते 24 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदत असणार आहे.
दरम्यान दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीविषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू.
अकरावी प्रवेशासाठी पहिल्या पसंतीचे कॉलेज नाकारल्यास दुसऱ्या यादीतही प्रवेश मिळणार नाही – हि बातमी आपण अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा.