
Five-day working week : बँक कर्मचाऱ्यांना आता लवकरच आठवड्यातून पाच दिवस काम करण्याची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय बँकांमध्ये आठवड्यातून फक्त पाच दिवस काम आणि दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी प्रस्तावित असून यावर 28 जुलै रोजी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
इंडियन बँकिंग असोसिएशन पुढील आठवड्यात म्हणजे शुक्रवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बैठकीत याबाबत निर्णय घेईल, असे अहवालात म्हटले आहे.
Five-day working week : जाणून घ्या सविस्तर
CNBC च्या अहवालानुसार, दोन्ही संस्था 28 जुलैच्या बैठकीत पाच दिवसांचा कामाचा आठवडा, पगारवाढ आणि सेवानिवृत्तांसाठी गट वैद्यकीय विमा पॉलिसींची आवश्यकता यावर चर्चा करणार आहेत.
इंडियन बँकिंग असोसिएशनने याबाबत सरकारला प्रस्ताव पाठवला होता दरम्यान हा प्रस्ताव मान्य झाल्यास बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस काम आणि दोन दिवसाची साप्ताहिक सुट्टी मिळेल.
मात्र यामुळे बँक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त आणखी 40 मिनिटे शिल्लक काम करावे लागेल. दरम्यान हा प्रस्ताव मंजूर होणार कि नाही याकडे सर्व बँक कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले – त्यामुळे याविषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू.
2 thoughts on “Five-day working week : 28 जुलैपासून बँकमध्ये लागू होणार पाच दिवसांचा आठवडा”