
whatsapp new safety features : व्हॉट्सअॅपने आता आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन सेफ्टी टूल्स तयार केले आहे.
अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या मेसेजबाबत व्हॉट्सअॅपने हे नवीन सेफ्टी फीचर तयार केलं आहे. सध्या हे फीचर काही बीटा यूजर्सना उपलब्ध करून देण्यात आलं आहे.
ज्या अँड्रॉईड यूजर्सकडे व्हॉट्सअॅप बीटाचे 2.23.16.6 हे व्हर्जन आहे,
त्यांना हे फीचर उपलब्ध होणार आहे, सध्या या फीचरची चाचणी सुरू असून, लवकरच हे सेफ्टी टूल सर्व यूजर्सना उपलब्ध होईल असे WABetaInfo या वेबसाईटने म्हटले आहे.
whatsapp new safety features : पहा कसे आहे हे फीचर्स
या फीचरमुळे यूजरला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून आलेला मेसेज एका वेगळ्या प्रकारच्या स्क्रीनवर दिसणार आहे.
तसेच अनोळखी नंबरवरुन आलेला मेसेज तुम्ही वाचला आहात की नाही, हे त्या व्यक्तीला कळणार नाही.
म्हणजेच, तुमचे रीड रिसिप्ट ब्लू टिक सुरू जरी असतील, तरीही अनोळखी व्यक्तीला तुम्ही मेसेज वाचल्यानंतरही ब्लू टिक्स दिसणार नाहीत.
तुम्ही या व्यक्तीचा नंबर सेव्ह केला,
किंवा त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला तरच तुम्ही मेसेज वाचला असल्याचं या व्यक्तीला कळणार आहे.
तुम्हाला या व्यक्तीचे मेसेज नको असतील तर तुम्ही तिला ब्लॉक करू शकता.
या फीचर्समुळे यूजरना अनोळखी नंबरवरुन होणारा त्रास कमी होणार आहे, असेही व्हॉट्सअॅपने म्हटले आहे.
व्हाट्सअँपचे इतर फीचर्स
प्रत्येक युजर्सचे फेव्हरेट मेसेजिंग प्लॅटफॉर्म अशी ओळख असलेले व्हाट्सअँप आपल्या वापरकर्त्याच्या सोयीसाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स सादर करत असते.
हे वर्ष देखील व्हाट्सअँप साठी विशेष महत्वाचे ठरले. कारण, या देखी वर्षी व्हाट्सअँपने आपल्या युजर्ससाठी असे अनेक चांगले फीचर्स लाँच केले आहेत, जे प्रत्येक युजर्ससाठी अतिशय उपयुक्त आहेत.
तर मित्रांनी आज आम्ही आपल्याला WhatsApp ने आपल्या मेसेजिंग अॅपमध्ये कोणती कोणती वैशिष्ट्ये जोडली आहेत, त्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत .
आणि यापैकी काही प्रमुख फीचर्सबद्दल आपल्याला सांगायचे झाल्यास आता युजर्स कोणताही ग्रुप सहज सोडू शकतात.
याचबरोबर , वापरकर्ते कोणालाही न कळवता व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेरसहज पडू शकतात.
आणि जेव्हा तुम्ही एखादा ग्रुप सोडता, तेव्हा संपूर्ण गटाला सूचित करण्याऐवजी फक्त प्रशासकांना याची माहिती मिळते.
1 thought on “whatsapp new safety features : आता व्हॉट्सअॅपमध्ये येणार नवे सेफ्टी फीचर्स, जाणून घ्या सविस्तर”