Farmer Complaint WhatsApp Numbers : आता डायरेक्ट कृषी विभागाकडे करता येणार तक्रार

Farmer Complaint WhatsApp Numbers

Farmer Complaint WhatsApp Numbers : सध्या शेतकऱ्यांची पीक लागवड करण्याची गडबड सुरु आहे. अशातच अनेक शेतकऱ्यांची बियाणे, कीटकनाशके,  मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असते.

याच फसवणुकीच्या पार्शवभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नवीन व्हाट्सॲप क्रमांक जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान काही अडचणी आल्यास व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवता येणार आहे.

कशी करता येणार तक्रार

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी 9822446655 या अधिकृत व्हाट्सॲप नंबरवर काही समस्या असल्यास व्हाट्सॲप संदेशाद्वारे आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे.

Farmer Complaint WhatsApp Numbers

तसेच आपण 8446117500, 8446221750 किंवा 8446331759 या भ्रमणध्वनीवर संपर्क देखील साधू शकता. याशिवाय कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी 18002334000 या कृषी विभागाचा हेल्पलाईन नंबरवर देखील संपर्क करू शकता.

तक्रार करन्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांची तक्रार निवारण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून निवारण कक्ष देखील सुरु केला आहे. हा कक्ष 24 X7 कार्यरत असणार आहे.

तसेच शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या इमेल पत्त्यावर देखील करु शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येणार, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.

कृषी विभागाने जारी केलेले हे व्हाट्सॲप क्रमांक – सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे आहेत, आपण इतरांना देखील शेअर करा.

इतर बातम्या

Aadhaar details update : आपल्या आधार डिटेल्स अपडेट करण्याची आता आपण ऑनलाइन पद्धत झाली आणखी सोपी.

Leave a Comment

error: Content is protected !!