GST-NEW-RULES : कौन्सिलच्या बैठकीत काय स्वस्त, काय महाग – पाहा संपूर्ण लिस्ट

GST-NEW-RULES

GST-NEW-RULES : काल मंगळवारी GST कौन्सिलची ५० वी बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीतील निर्णयानंतर काही वस्तू स्वस्त झाल्या तर काही वस्तूंच्या किंमती आता वाढणार आहेत.

GST-NEW-RULES : पहा काय स्वस्त, काय महागणार

जीएसटी कौन्सिलनं ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑनलाइन गेमिंग, कसिनो, हॉर्स रेसिंग महाग होतील.

तसेच मल्टी युटिलिटी आणि क्रॉसओव्हर युटिलिटी म्हणजेच XUV श्रेणीतील वाहनांवर २२ टक्के उपकर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या व्यतिरिक्त २२ टक्के कम्पेन्सेशन सेस लागू केल्यानं वाहनं आणखी महाग होतील.

दरम्यान आयात केलेल्या कर्करोगाच्या औषधांवर IGST न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे सिनेमागृहातील खाण्यापिण्याचे पदार्थ स्वस्त होणार आहेत.

याचबरोबर जीएसटी कौन्सिलनं खासगी ऑपरेटर्सच्या जीएसटी उपग्रह प्रक्षेपण सेवेला सूट दिली आहे त्यामुळे सॅटलाईट सर्व्हिस लाँच स्वस्त होणार. कच्च्या आणि न तळलेल्या स्नॅक पॅलेट्सवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे.

तसेच फिश पेस्टवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. तर कृत्रिम जरीच्या धाग्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के आणि एलडी स्लॅगवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे – त्यामुळे या वस्तू स्वस्त होणार आहेत.

GST कौन्सिलच्या बैठकीत काय स्वस्त, काय महाग – याविषयी असलेली हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा.

GST-NEW-RULES

Talathi Bharti 2023 Apply Online

IBPS Clerk Recruitment 2023: यावेळी 4045 पदांसाठी लिपिक परीक्षा होणार,

Leave a Comment

error: Content is protected !!