Mobiles Merits and Demerits : मोबाईल चे फायदे व तोटे

Mobiles Merits and Demerits

Mobiles Merits and Demerits : आजकाल मोबाईल हा पोळ्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनलं आहे.फक्त आपणनाही तर लहान मुले सुद्धा या सवयीचे शिकार बनले आहेत. वेळीच सावधान न झाल्यास आपल्या पाल्याचे आयुष्य वेगळ्याच वळणावर जाऊ शकते. म्हणून या पोस्ट मध्ये आपण जाणून घेऊ मोबाईल चे फायचे व तोटे काय आहेत .

मोबाईल ही आता आपली गरजेची वस्तु बनलेली आहे ।

पूर्वी जसे म्हंटले जायचे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत,परंतु आता त्यात मोबाईल देखील माणसाची मूलभूत गरज बनला आहे ।

अगदी कमी कालावधीत ह्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाने माणसाच्या आयुष्यातील महत्वाचे स्थान काबीज केले आहेत।

आज आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल हा महत्वाचा घटक बनले आहे ।

मोबाईल नसेल तर आपली अनेक कामे होत नाहीत आणि हल्ली तर मोबाईल शिवाय कामच होत नाही ।

कपडे खरेदी, फिरायला जाताना गाडी बुकिंग, नवीन माहिती घेण्यासाठी, डॉक्टर कडे नंबर लावण्यासाठी,पैसे पाठवण्यासाठी व जेवण मागवण्यासाठी आता मोबाइल च लागतो ।
आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या मोबाईल चे फायदे आणि तोटे / दुष्परिणाम जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया ।

मोबाईल चे फायदेMobiles Merits and Demerits

१) हवे त्या व्यक्ती सोबत हवे तेंव्हा आपण बोलू शकतो ।

२) जगातील कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही फोन द्वारे पोहचू शकता ।

३) दिवाळी सारख्या सणांच्या शुभेच्छा आपण आपल्या नातेवाईकांना व आप्तेष्टाना मोबाईल द्वारे देऊ शकता मग ते जगात कुठेही राहायला असुध्या |
४) मोबाईल एक मनोरंजनाचे उत्तम साधने आहेत ।

तुमच्या आवडीचा चित्रपट, गाणे किंवा भजन कीर्तन पाहिजे तेंव्हा तुम्ही मोबाईल मध्ये बघू शकता ।


५) मोबाईल मध्ये आवश्यक माहिती जतन करून ठेवू शकतो । तसेच फोटो आणि व्हिडिओ काढू शकतो।

६) घरबसल्या कोणतीही खरेदी तुम्ही मोबाईल वरून करू शकता ।

७) मग ते कपडे,गाडी,लहान मुलांची खेळणी,बूट-चप्पल असोत व मग हॉटेल मधून जेवण मागवणे असो ।

यांसारख्या गोष्टी तुम्ही अगदी काही क्लिक वर ऑर्डर करू शकतो |
८) दुकानदार तसेच व्यापारी लोकांना त्यांचे दैनंदिन हिशोब वही व खतावणी मध्ये मांडण्या पेक्षा आता मोबाईल मधील काही अॅप्लिकेशन च्या मदतीने आगदी सहजरीत्या करता येऊ शकतो |

८) मोबाईल मधील whatsapp आणि facebook सारख्या इतर अॅप्लिकेशन च्या मदतीने जगातील कोणत्याही कोपर्‍यातील व्यक्ती सोबत तुम्ही विडियो कॉल द्वारे समोरा बोलू शकतो |


९) अभ्यासाशी संबंधित माहिती जी समजली नसेल आणि अजून सखोल माहिती हवी असेल.

तर ती तुम्हाला मोबाईल वरुन इंटरनेट च्या मदतीने समजून घेता येऊ शकतो |
१०) बँकेचे व्यवहार आता तुम्ही मोबाईल च्या मदतीने काही क्लिक वर करू शकता |

तुम्ही मोबाईल च्या मदतीने जगामध्ये कुठेही पैसे पाठवू व स्वीकारू शकतो

मोबाईल चे तोटे / मोबाईल चे दुष्परिणाम –

१) मोबाइल च्या अतिरेक झाल्यामुळे घराघरातील व्यक्तींमधील संवाद संपत चालो आहोत ।

पूर्वी घरात ज्या गप्पा मारल्या जायच्या त्या कमी होत चालल्या आहेत ।

हल्ली घरातील आई वडील व मुले आपल्या आपल्या मोबाईल मध्ये गुंगलेले पाहायला मिळतात आपापसात बोलणे कमी झाले आहे

2) मोबाईल मुळे वेळेचा अपव्यय होतो ।

सरकारी कर्मचारी म्हणा किंवा खाजगी कर्मचारी हल्ली सगळ्याच लोकांकडे मोबाईल असतो हे लोक कामाच्या ठिकाणी मोबाईल वर टाईमपास करताना पाहायला मिळतात ।

अशा कार्यालयात मोबाईल बंदी गरजेची आहे ।
3) वाहन चालवताना मोबाईल वापरल्यास अपघात होण्याची शक्यता असते ।

4) बऱ्याच जणांना मोबाईल चार्जिंग ला लावून बोलण्याची सवय असते काही मोबाईल असे वापरल्यास गरम होऊन त्यांचा विस्फोट होऊ शकतो आणि वापरकर्त्यास मोठी ईजा होऊ शकते ।

त्यामुळे अशा पद्धतीने मोबाईल वापरणे शक्यतो टाळावे ।

Leave a Comment

error: Content is protected !!