QR Code On Medicines : आता औषधांच्या पॅकेजवर QR कोड लावणे बंधनकारक

QR Code On Medicines

QR Code On Medicines : तुम्हाला माहिती असेल, सध्या साथीचे रोग सर्वत्र पसरत आहेत. बऱ्याचदा आपण या आजारांवर घरगुती पद्धतीने किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध घेतो.

मात्र औषध घेताना ती औषध बनावट तर नाहीत ना ? याची भीती मनात असते.

त्यामुळे ही भीती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आजपासून 300 हून अधिक औषधांवर क्युआर कोड लावणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे.

त्यानुसार भारताच्या ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडिया ने तसे आदेश फार्मा कंपन्यांना दिले आहेत.

पहा काय सांगितले केंद्र सरकारने QR Code On Medicines

या निर्णयामुळे औषधांवरील बारकोड स्कॅन केल्यास ग्राहकांना ते घेत असलेल्या औषधांबद्दलची सर्व महत्त्वाची माहिती मिळणार आहे.

देशातील ज्या टॉप 300 कंपन्या आहेत त्यामध्ये एलिग्रा, शेलकेल, काल्पोल, डोलो आणि मेफ्टेल यांसारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे.

देशात वाढत असलेल्या बनावट औषधांच्या व्यवसायाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

या QR कोडमध्ये औषधाचे जेनेरिक नाव, ब्रँडचे नाव, उत्पादकाचं नाव, पत्ता, बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, औषधाची एक्सपायरी डेट आणि उत्पादकाचा परवाना क्रमांक हि सर्व माहिती असणार आहे.

तसेच DCGI ने दिलेल्या आदेशानुसार, जर औषधांवर बारकोड किंवा QR कोड टाकले नाहीत तर त्या औषध कंपन्यांवर कारवाई केली जाणार असून त्यांच्याकडून मोठा दंड आकारला जाणार आहे.

आता मेडिकल औषधांविषयी – QR कोडमध्ये माहिती मिळणार, हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा.

इतर बातम्या :

Ujjwala gas Yojana 2023 : प्रधानमंत्री चे उज्वला गॅस योजना ही महाराष्ट्र योजना 2023

Holidays List In August : ऑगस्ट महिन्यात किती दिवस बंद राहतील बँका ?

Leave a Comment

error: Content is protected !!