
Railway Ticket New Rule : रेल्वे प्रशासनाने आरक्षण तिकिटाबाबत आज काही नवे नियम जारी केले आहेत – त्यानुसार जर आपण आपल्या बोर्डिंग स्टेशनपासून 10 मिनिटांनंतर, ट्रेनमध्ये आपल्या सीटवर दिसला नाहीत तर आपले तिकीट कॅन्सल होऊ शकते.
कारण आता टीटीई आपली उपस्थिती नोंदवण्यासाठी केवळ 10 मिनिटांचीच वाट पाहील, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
Railway Ticket New Rule : पहा कसे आहेत नवे नियम
तुम्हाला माहिती असेल यापूर्वी, एक-दोन स्टेशननंतरही प्रवासी आपल्या सीटवर पोहोचले, तरी टीटीई त्यांची उपस्थिती मार्क करत होता. मात्र आता असे होणार नाही.
आता चेंकिंग स्टाफ ‘हॅन्ड हेल्ड टर्मिनलच्या’ माध्यमाने तिकीट चेकिंग करतात. यात प्रवासी आला आहे किंवा नाही याची माहिती द्यावी लागते. यापूर्वी हे काम कागदांवर चालायचे.
यात टीटीई पुढील स्टेशनपर्यंत वाट पाहत होता. मात्र आता तसे होणार नाही, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.
आता ट्रेन सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांपर्यंत सीटवर पोहोचला नाहीत तर तिकीट कॅन्सल होणार – हि बातमी रेल्वे प्रवाशांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.