dole yene upay : डोळ्यांच्या साथीबाबत आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

dole yene upay

dole yene upay : राज्यात अनेक भागांत डोळे येण्याची साथ सुरू झाली आहे. ॲडिनो विषाणूमुळे डोळे येत असून राज्यात सर्वाधिक रुग्ण संख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात नोंदविण्यात आली आहे

👉🏻कोरडा खोकला दूर करण्यासाठी 7 घरगुती उपाय, आजच ट्राय करा..!

अशावेळी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. रुग्णांनी डोळे आल्यास डोळे थंड पाण्याने धुवावे, तसेच अशा व्यक्तींनी रुमाल, टावेल स्वतंत्र वापरावा. सार्वजनिक ठिकाणी स्पर्श करू नये, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.

डोळे येण्याची लक्षणे

डोळे लाल होणे
वारंवार पाणी येणे
डोळ्याला सूज येणे
डोळे कचकच करणे
किंचित अंधूक दिसणे

अशी घ्या काळजी # dole yene upay

वैयक्तिक स्वच्छता ठेवने
वारंवार हात धुणे
वारंवार डोळ्यांना हात न लावणे
डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडणे
परिसर स्वच्छ ठेवून माशा, चिलटांचे प्रमाण कमी करणे
नेत्रतज्ज्ञांकडे जाऊन लवकरात लवकर उपचार करणे

डोळे येण्याची साथ मोठया प्रमाणात का पसरते ?

खरं तर पावसाळ्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. आणि यामुळे व्हायरस पसरण्याची संधी जास्त मिळते.

ओलाव्यामुळे हा संसर्ग खूप काळ शरीरात राहतो.

आपल्याला वारंवार घाम येत असतो आणि यामुळे आपण आपला चेहरा सारखा पुसत राहतो. चेहरा पुसताना आपण डोळ्यांनाही हात लावत राहतो.

आणि या सर्व कारणांमुळे आपल्याला संसर्ग होतो आणि डोळे येण्याची साथ जास्त पसरते.

संसर्ग झाल्यास कोणते उपचार करावे ?

डोळे आल्यास साधारणपणे दोन आठवड्यांच्या कालावधीत हा आजार बरा होऊ शकतो.

डॉक्टर सांगतात की, हा आजार बरा करण्यासाठी आपल्या शरिराच्या रोगप्रतिकारक शक्तीला पुरक अशीच औषधं दिली जातात.

डॉक्टर डोळ्यात टाकण्यासाठी काही ड्रॉप सुद्धा देतात. तसंच जर ताप किंवा तत्सम काही लक्षणं दिसत असतील तर त्यावरही काही वेगळी औषधं दिली जाऊ शकतात.

 तज्ञ डॉ.  याबाबतीत सांगतात की, या औषधांचा वापर डॉक्टरांच्याच सल्ल्याने करावा आणि त्यांनी सांगितलेल्या प्रमाणातच औषधं घेणं आवश्यक आहे.

ज्यांना संसर्ग झाला आहे त्यांना प्रकाशाचा त्रास देखील होऊ शकतो. आणि त्यामुळे त्यांनी गॉगल वापरावे, तसंच हात स्वच्छ धुवत राहावेत जेणेकरुन डोळ्यातून आलेला स्त्रावाला हात लागल्याने इतरांना त्याचा संसर्ग होणार नाही.

कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे टाळावे .

👉🏻आपल्या आधार डिटेल्स अपडेट करण्याची आता आपण ऑनलाइन पद्धत झाली आणखी सोपी.

घरामध्ये  स्वच्छ टॉवेल, रुमाल वापरा.

हा आजार फार गंभीर स्वरुपाचा गणला जात नसला तरीही त्याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये, असं डॉक्टर सांगतात.

“डोळे आल्यावर हा आजार काही दिवसांनी आपोआप बरा सुद्धा होऊ शकतो.

पण काही मोजक्या केसेसमध्ये संसर्ग वाढण्याची शक्यता असते आणि तो संसर्ग बुबुळांमध्ये जाऊ शकतो.

तेव्हा बुबुळांवर पांढरे ठिपके दिसू लागतात असा परिस्थितीमध्ये आजाराचा गंभीरपणा वाढतो.

औषधांनी आणि योग्य काळजी घेऊन बुबुळातील संसर्गही दूर होतो. पण त्यासाठी वेळ लागतो.

त्यामुळे डोळे येण्याची लक्षणं जाणवायला सुरुवात झाल्या झाल्या योग्य औषधोपचार आणि काळजी घेणं गरजेचं आहे,” असं  तज्ञ डॉ. यांनी सांगितलं.

संसर्ग होऊ नये यासाठी कोणती काळजी घ्यावी?

डॉक्टर सांगतात की, कोणताही संसर्ग जन्य आजारापासून बचाव करण्यासाठी जी काळजी घेणं गरजेचं असतं, ती घेतल्याने या आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.

  • संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेले रुमाल, टावेल वापरणं टाळावं
  • हात स्वच्छ धुवावेत
  • डोळ्यांना सारखा हात लावू नये

👉🏻इतर आजारावरील घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈🏻

2 thoughts on “dole yene upay : डोळ्यांच्या साथीबाबत आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी”

Leave a Comment

error: Content is protected !!