New Education Policy 2023 : आता पुढील वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी नुकतीच केली आहे.
आता केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिल्यामुळे, ३४ वर्षांनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार.
तर मित्रानो यापुढे लागू होणाऱ्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत खूप मोठे बदल करण्यात येणार आहेत.
आणि त्यामुळे यापुढे सेमिस्टर पॅटर्न अंतर्गत बोर्डाच्या परीक्षा देखील वर्षातून २ वेळा होणार की काय ,
असा प्रश्न सर्व विद्यार्थी व पालकांना पडला आहे.
त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे.
आणि शिवाय, इंजिनियरिंग तसेच मेडिकल हे अभ्यासक्रमही येत्या काळात मराठीमध्ये शिकवलं जाणार आहेत.
New Education Policy 2023 : तर जाणून घ्या कसे असतील बदल
नवीन शैक्षणिक धोरण इथून पुढील काळात चांगल्या प्रकारे महत्वाचे ठरावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे.
त्याचबोरबर राज्य सरकारही या निर्णयाचीअंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या नवीन शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याची माहिती यावेळी दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
केंद्र सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून, तब्बल ३४ वर्षांनंतर देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन धोरण लागू केले जाणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून यावर्षी शिक्षण पद्धतीमध्ये खूप मोठे बदल देखील करण्यात आले आहेत.
देशामध्ये शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत दहावी+बारावी असं होतं. पण आता यापुढे नव्या शैक्षणिक धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असणार , असा उल्लेख नव्या शैक्षणिक धोरणात केलेला नाहीत.
त्यामुळे दहावी+बारावी ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी पाच+तीन+तीन+चार अशी नवी व्यवस्था लागू होणार आहे.
नव्या शैक्षणिक धोरणातील महत्त्वाची वैशिष्ट्ये
- दहावी+बारावी ऐवजी आता शिक्षणाचा पाच +तीन +तीन + चार चा नवा पॅटर्न.
- पाचवीपर्यंत शिक्षण मातृभाषेत, प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच.
- पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न.
- सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश.
- स्वतः विद्यार्थी, सहविद्यार्थी आणि शिक्षक करणार मूल्यांकन.
- शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळण्यावर भर.
- सरकारी आणि खाजगी शाळांमधील शिक्षणात समानता.
2 thoughts on “New Education Policy 2023 : आता यापुढे बोर्डाची परीक्षा होणार दोनदा”