NTA Scholarship 2023 : नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना १ लाख २५००० शिष्यवृत्ती मिळविण्यसाठी आताच अर्ज करा

NTA Scholarship 2023

NTA Scholarship 2023 : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित PM Young Achievers Scholarship Scheme (पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्किम) म्हणजेच यशस्वी योजना २०२३ या अंतर्गत शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षेसाठी सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे.

पीएम यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड या नावाने ओळखली जाणारी ही शिष्यवृत्ती योजना भारत सरकारद्वारे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे आयोजित केली जाते.

७५००० ते १ लाख २५००० पर्यंत मिळेल शिष्यवृत्ती

PM यशस्वी योजने आंतर्गत, इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC), बिगर अधिसूचित, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती (DNT/NT/SNT) श्रेणीतील पूर्ण १५ हजार गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार असून शिष्यवृत्तीआंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने लिहून दिलेल्या नियमांनुसार ७५,००० ते १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे.

इयत्ता ९ वी ते ११ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया (यशस्वी) सुरू करण्यात आली आहेत .

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

याआंतर्गत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाणार असून, या परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षि १.२५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहेत.

त्यासाठी पूर्ण देशभरातून १५ हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार.

परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने करण्यात येणार आहे.

शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून, २९ सप्टेंबर ही परीक्षेची तारीख जाहीर केल्याली आहे.

यशस्वी प्रवेश परीक्षा २०२३ : NTA Scholarship 2023

१) PM यशस्वी योजने आंतर्गत, इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC), बिगर अधिसूचित, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती (DNT/NT/SNT) श्रेणीतील पूर्ण १५ हजार गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार.
२) अडीच  लाखाहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांना या शिष्यवृत्तीचा फायदा घेता येणार नाही.

अशी पार पडणार परीक्षा

१) परीक्षा आयोजित करण्याची पद्धत : पेन अँड पेपर (OMR Based)
२) परीक्षेत १०० MCQ प्रश्न विचारण्यात येणार आहे.
३) सदर परीक्षा २.३० तास (१५० मिनिटांची) असणार आहे
४) ही परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषेत देता येणार आहे.
५) २९ / ९ / २०२३ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
६) या शिष्यवृत्तसाठी आणि परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या वियार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
७) या शिष्यवृत्तसाठी आणि परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे अनिवार्य आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 आवश्यक कागदपत्रे

पासपोर्ट फोटो 

उमेदवार आधार कार्ड

मार्कशीट

उत्पन्न प्रमाणपत्र 

जन्म प्रमाणपत्र किंवा टीसी 

रहिवाशी पुरावा

जात प्रमाणपत्र.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “NTA Scholarship 2023 : नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना १ लाख २५००० शिष्यवृत्ती मिळविण्यसाठी आताच अर्ज करा”

Leave a Comment

error: Content is protected !!