Home Remedies for Dry Cough : खोकला कोरडा असो किंवा मग ओला असो जीवघेणाच असतो. पण कोरडा खोकला अतिशय त्रासदायक ठरतो. खोकताना पोट आणि बरगड्यांमध्ये तीव्र वेदना होतात. काही घरगुती उपाय करून तुम्ही कोरड्या खोकल्याच्या त्रासातून स्वतःला मुक्त करू शकता.
कोरडा खोकला दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय, आजच ट्राय करा..!
Home Remedies for Dry Cough
बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या-मोठ्या आजारांची लागण होत असते. यातही सर्दी, खोकला व ताप येण्याच्या तक्रारी अधिकतर उद्भवतात. सर्दी व तापामुळे खोकल्याचा त्रास अधिक बळावतो. त्यातही कोरडा खोकला त्रासदायक ठरतो. योग्य वेळेत यावर उपाय केल्यास तुम्हाला आराम मिळेल. पण दुर्लक्ष केलं तर प्रकृती गंभीर देखील होऊ शकते.
1) आले आणि मीठ.
खोकल्याचा त्रास कमी प्रमाणात असला तरीही त्यावर उपाय करणं आवश्यक असते .
यासाठी तुम्ही घरगुती तसंच नैसर्गिक उपचारांची मदत तुम्ही घेऊ शकतात.
सर्दी व खोकला होणे ही छोटी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.
याच निष्काळजीपणामुळे गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते.
आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
Registration of births and deaths : यापुढे ‘जन्म प्रमाणपत्रच’ एकमेव कागदपत्र म्हणून गाह्य धरले जाईल – केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2) मध
खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून आल्याचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे.
आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा.
हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या किंवा जो रस निघेल तो गिळत राहा.
पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा.
पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ आले तोंडामध्ये ठेवू नका.
👉🏻आता कृषी सेवकाचे मानधन ६००० हजारवून होणार १६००० हजार रुपये होणार; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
3) हळदीचे दूध
हळदीचे दूध प्यायल्याने केवळ खोकलाच नाही तर कित्येक आजारांपासून तुमची सुटका होण्यास मदत मिळते.
एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या. कोरड्या खोकल्याची समस्या अगदी काही दिवसांत कमी होईल.
हळदीमध्ये कर्रक्युमिन नावाचे घटक असते. या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो.
👉🏻आपल्या आधार डिटेल्स अपडेट करण्याची आता आपण ऑनलाइन पद्धत झाली आणखी सोपी.
4) गूळ
आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणावारांना गुळाचे गोडधोड पदार्थ केले जातात त्यामागील उद्देशच हा आहे की आरोग्यदायी गुळ पोटात जावा व आपण कायम निरोगी राहावं.
सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे. गुळातील पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते.
सर्दी खोकल्याव्यतिरिक्त गुळामुळे पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. कोमट पाण्यामध्ये गूळ पावडर मिक्स करा आणि प्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाण आणि दिवसातून किती वेळा हा उपाय करावा याबाबत सल्ला घ्यावे.
👉🏻आता व्हॉट्सअॅपमध्ये येणार नवे सेफ्टी फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
5) मिठाच्या पाण्याच्या गुळण्या
Home Remedies for Dry Cough
एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या व त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा.
खोकला व घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं श्वसन नलिकेतील संसर्ग दूर होण्यास मदत मिळते. शिवाय खोकल्यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होतात.
मीठ अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण असतं जे घशातील व तोंडातील बॅक्टेरिया मारण्यास व ओरल हेल्थ जपण्यास मदत करतं.
👉🏻 सीताफळ बागातील कीडीचे व्यवस्थापन
6) ज्येष्ठमधाचा चहा
ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा.
१० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास चहामध्ये मध मिक्स करू शकता. दिवसातून दोन वेळा हा चहा तुम्ही पिऊ शकता.
👉🏻28 जुलैपासून बँकमध्ये लागू होणार पाच दिवसांचा आठवडा
7) गरम पाण्याची वाफ
सर्दी खोकल्यामुळे कधी कधी आपल्याला श्वास घेणे सुद्धा कठीण होते. अशावेळी गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ बाहेर पडतो.
श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात. तसंच चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, माती आणि दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते. पण आठवड्यातून दोन वेळाच हा उपाय करावा.
अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.
3 thoughts on “Home Remedies for Dry Cough : कोरडा खोकला दूर करण्यासाठी 6 घरगुती उपाय, आजच ट्राय करा..!”